esakal | तर... आम्हीही राष्ट्रपतींकडे तक्रार करू : मंत्री हसन मुश्रीफ
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Hasan Mushrif say we will also report to the President

राज्य सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक आहे. तसेच प्रामाणिक शेतकऱ्याला चांगला लाभ देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच मुंबईत बैठकीचे आयोजन केल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

तर... आम्हीही राष्ट्रपतींकडे तक्रार करू : मंत्री हसन मुश्रीफ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - महाविकास आघाडीवर आरोप करण्यापूर्वी केंद्रातील भाजप सरकारने दिलेल्या आश्‍वासनांबाबत आत्मपरीक्षण करावे, अन्यथा आम्हीही राष्ट्रपतींकडे तक्रार करू, अशा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. महाविकास आघाडीने कर्जमाफीबाबत फसवणूक केली आहे. जाचक अटींमुळे कर्जमाफी मिळणार नाही, असा आरोप भाजप नेत्यांकडून सुरू आहे. याबाबत त्यांनी राज्यपालांकडे तक्रार करण्यासाठी ग्रामपंचायत, सेवा संस्थांकडून पत्र घेत असल्याकडे मुश्रीफ यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

राज्य सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक

मुश्रीफ म्हणाले, ‘‘राज्यपालांच्या अधिकारांविषयीची भाजपच्या नेत्यांना माहिती नसावी. पाच वर्षांत भाजप सरकारने व मागील सात वर्षापासून केंद्रातील भाजपने अनेक घोषणांचा भडिमार केला. मात्र त्यांची पूर्तता केलेली नाही.’’ राज्य सरकार कर्जमाफीबाबत सकारात्मक आहे. तसेच प्रामाणिक शेतकऱ्याला चांगला लाभ देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच मुंबईत बैठकीचे आयोजन केल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

वाचा - तर... चंद्रकांत दादांचा सत्कार करु : मंत्री हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार अशी घोषणा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील खुर्चीतून कोसळले. ज्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ती मंडळी अस्वस्थ आहेत. त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न अशा अशा घोषणांतून भाजप नेते करत असल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला. दिल्लीतील भाजपच्या पराभवाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. जिल्ह्यातील विकासकामांत मतभेद करणार नसल्याचे सांगत विरोधकांनाही निधी कमी पडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

loading image