
Almatti Dam Height : संसदेच्या अधिवेशनात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील खासदारांनी कर्नाटकच्या आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला विरोध करावा. राज्य शासनही ‘आलमट्टी’ची उंची वाढू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात विधी तज्ज्ञांशी चर्चा करून प्रभावी मुद्दे मांडेल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिली.
आलमट्टी उंची वाढीविरोधात त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या दोन्हीसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांची बैठक माझ्या उपस्थित घेऊ, असेही ते म्हणाले.