

इचलकरंजीत धक्कादायक प्रकार! बारमध्ये वेटरशी किरकोळ वाद झाला आणि बाहेर पडताच तरुणाचा भररस्त्यात खून करण्यात आला.
esakal
Ichalkaranji Major Crime : (ऋषीकेश राऊत) : इचलकरंजी शहरातील कबनूर रोडवरील पेट्रोल पंपासमोर मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून निर्घृण खून करण्यात आला. अभिनंदन जयपाल कोल्हापूरे (वय ४४, रा. इंदिरानगर, कबनूर) असे मृताचे नाव असून तो खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.