

इचलकरंजीत अल्पवयीन मुलाने वडिलांच्या मित्रावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.
esakal
Kolhapur Crime News : सहकारनगर परिसरात लहान मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर जुन्या वादातून अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. भरचौकात लोखंडी रॉडने डोक्यात जबर वार केल्याने मंगेश उर्फ रविराज जनार्दन कांबळे (वय ३०, रा. सहकारनगर साइट नं. १०२) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता.३०) रात्री साडेनऊच्या सुमारास सहकारनगर येथील चौकात घडली.