

Minor Girl
esakal
Minor Girl Sangli News : चिरमुरे आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणास दोषी धरून अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती जे. ए. मोहंती यांनी सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली. तिमाप्पा अंजनेया कवाडी (वय ३०, रा. डोम तुंगीमानदाल्म पागद्राई, ता. पट्टणकोडा, जि. करनूल, राज्य आंध्रप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.