चौकशीत या अल्पवयीन मुलांनी ‘झपाटलेला’ चित्रपट पाहून असे कृत्य केल्याची कबुली दिल्याने पोलिसही (Kolhapur Police) अवाक् झाले.
कोल्हापूर : ‘झपाटलेला’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील (Zapatlela Marathi Movie) एक अजरामर चित्रपट होऊन गेला. ‘तात्या विंचू’ या बाहुल्याची त्याकाळी जोरदार चर्चा झाली. चित्रपटातील अनेक डायलॉगही लोकांना तोंडपाठ आहेत. परंतु, या चित्रपटाच्या प्रभावाने दोन अल्पवयीन मुलांनी एक रिव्हॉल्व्हर कशी चालवायची? याचा कित्ताच गिरवला. एका सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाच्या घरातून त्यांचे रिव्हॉल्व्हर चोरून त्यातून तब्बल २० राऊंड फायर केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला.