
गौरव डोंगरे
कोल्हापूर : गंजी गल्लीत सापडलेल्या गांजाचे ‘मिरज’ कनेक्शन शोधून काढण्यात लक्ष्मीपुरी पोलिसांना यश आले. तपासाच्या निमित्ताने पोलिसांनी घेतलेल्या माहितीत पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या तस्करीचे मुख्य केंद्र मिरजच असल्याचे आता उघड झाले आहे. शिरोळ तालुक्यात सापळा रचून मिरजेच्या मदिना शेख या पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महिलेला पकडण्यात आले. साथीदारासोबत पाच किलो गांजा घेऊन ती बिनधास्तपणे जिल्ह्यात आली होती. तिच्या चौकशीत मिरजेतील गांजा तस्करीचे नवनवे खुलासे होण्याची शक्यता आहे.