Ichalkaranji Crime : इचलकरंजीत ‘मिशन झीरो ड्रग्ज’, नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; पण मुख्य सूत्रधार पळाला

Mission Zero Drugs : ‘मिशन झीरो ड्रग्ज’ मोहिमेंतर्गत गावभाग पोलिस व पोलिस उपअधीक्षक पथकाने शहरातील नशेच्या अड्ड्यांवर रविवारी कारवाई केली.
Ichalkaranji Crime
Ichalkaranji Crimeesakal
Updated on

Kolhapur Crime News : ‘मिशन झीरो ड्रग्ज’ मोहिमेंतर्गत गावभाग पोलिस व पोलिस उपअधीक्षक पथकाने शहरातील नशेच्या अड्ड्यांवर रविवारी कारवाई केली आणि प्रतिबंधित मेफफेंटर्मीन सल्फेट या इंजेक्शन विकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

त्यांच्याकडून एकूण दोन लाख ३६ हजार ९६४ किमतीचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे. मुख्य संशयित संग्राम अशोकराव पाटील (वय २९, रा. श्रीपादनगर), सचिन सुनील मांडवकर (२५, रा. यशवंत कॉलनी) अभिषेक गोविंद भिसे (२५ रा. लालनगर, सर्व इचलकरंजी) असे त्यांची नावे आहेत. तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांना मिळालेल्या माहिती आधारे संग्राम पाटील याच्यासाठी श्रीपादनगर भागात सापळा रचण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com