
Kolhapur Crime : गौरव डोंगरे : ‘मी विश्वास नांगरे - पाटील बोलतोय, आमच्या सीनिअर अधिकाऱ्याला सहकार्य का करीत नाही?’ असे बोलणारी व्यक्ती आयपीएस अधिकारी नांगरे - पाटीलच असल्याचा दत्तात्रय पाडेकरांचा समज झाला. अधिकाऱ्याचा हुबेहूब चेहरा व आवाजाचा वापर करून ‘फेस स्वॅप’ या ए.आय. ॲपच्या मदतीने सायबर गुन्हेगारांनी पाडेकर यांची फसवणूक केल्याचे तपासात समोर येत आहे. डिजिटल अरेस्टचा जिल्ह्यात तिसरा प्रकार घडला असून यामध्ये वयोवृद्धांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे.