'मला आमदारकीचा विजयी चौकार मारण्याची संधी दे'; कोल्हापूरच्या अंबाबाईला शिंदे गटाच्या आमदारानं घातलं साकडं

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र आले तर जास्त आनंद होईल.’
MLA Bharat Gogawale
MLA Bharat Gogawaleesakal
Summary

किरीट सोमय्या आणि ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांनाच त्याची माहिती आहे. आम्ही कुठलेच घोटाळे केलेले नाहीत.

कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे हे दोन्हीही मराठी नेते हिंदुत्वासाठी काम करणारे आहेत. ते एकत्र आले तर आनंदच होईल’, असे वक्तव्य आमदार भरत गोगावले यांनी केले. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

MLA Bharat Gogawale
NCP Crisis : भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? दिलीप वळसे-पाटलांचं 'साहेब-दादां'बाबत परखड भाष्य

आमदार गोगावले (Bharat Gogawale) मम्हणाले, ‘आजवर तीन वेळा आमदार झालो आहे. आमदारकीचा विजयी चौकार मारण्याची संधी दे, असे साकडे श्री अंबाबाईला (Ambabai) घातले आहे. त्याशिवाय मंत्रीपदाची असणारी अपूर्ण इच्छा पूर्ण व्हावी, अशी प्रार्थनाही केली आहे. महिन्याभरत मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि ही इच्छा पूर्ण होईल, असे वाटते. अपात्र आमदारांबाबबत आम्ही जे जबाब दिले आहेत. त्यामुळे निर्णय आमच्याच बाजूने होईल.’

MLA Bharat Gogawale
जयंत पाटील, प्रतीक पाटील की सुमनताई? 'या' मतदारसंघांतून कोणाला मिळणार उमेदवारी? कार्यकर्त्यांच्या मागणीने चर्चांना उधाण

दरम्यान, किरीट सोमय्या आणि ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांनाच त्याची माहिती आहे. आम्ही कुठलेच घोटाळे केलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी काही बोलले तरी आमच्यावर काही फरक पडत नाही. सिंधुदुर्गातील पाणबुडीचा प्रकल्प कुठेही जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले असल्याचेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com