हद्दवाढ व्हावी यासाठी कृती समितीने निवेदन दिले आहे; तर हद्दवाढ नको म्हणून ग्रामीण भागातील जनतेने निवेदन दिले आहे. शहराची हद्दवाढ होण्याची आवश्यकता आहे, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.
कोल्हापूर : शहरातील लोक आता ग्रामीण भागात येऊन राहात आहे. असा उलटा प्रवास सुरू आहे. शहरातील समस्यांची सोडवणूक महापालिका करू शकत नाही. ते ग्रामीण भागाला काय सुविधा देणार. आमच्या ग्रामपंचायती नागरिकांना सर्व सुविधा पुरवत आहेत. त्यामुळे हद्दवाढीला (Kolhapur City Extension) आमचा विरोध आहे. जर याबाबतचा निर्णय एकतर्फी घेण्यात आला तर तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांनी घेतली.