कोल्हापुरात सोयीच्या राजकारणाचे संकेत; हसन मुश्रीफांकडून सूतोवाच, सहकारी संस्थांतील 'दोस्ताना' कायम राहणार

Kolhapur Politics Hasan Mushrif : ‘गोकुळ’वर गेल्या ३० वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक व स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.
Hasan Mushrif
Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ-सतेज-कोरे यांच्यातील दोस्ताना यापूर्वीही दिसला आहे. ‘राजाराम’च्या निवडणुकीतील कोरे यांची भूमिका वगळता ते पाटील यांच्यासोबत आहेत.

कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून पक्ष विधानसभा निवडणूक लढले. पण, निवडणुकीला आठवडा होण्यापूर्वीच जिल्‍ह्यात सोयीचे राजकारण रंगणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा व सहकारातील निवडणुका वेगळ्या असल्याचे सांगत जिल्ह्यात सोयीचे राजकारण होण्याचे संकेत कागलचे नूतन आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com