गोकुळ'मध्ये भेट : पी. एन.-महाडिक यांच्यात खलबते  

mla p n patil and former mla mahadecrav mahadik visit gokul political marathi news
mla p n patil and former mla mahadecrav mahadik visit gokul political marathi news
Updated on

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत काल सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात चर्चा झाली. "गोकुळ'च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात सायंकाळी पाचच्या सुमारास सुमारे अर्धा तास झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीसोबत न आल्यास काय करायचे यावर दोघांत खलबते झाली.पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेण्याचा प्रयत्न पी.एन. यांचा आहे.

तथापि पालकमंत्री पाटील यांच्या मालकीच्या हॉटेल सयाजीच्या घरफाळ्यावरून महाडिक यांचे पुतणे व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आरोप केले आहेत. हा मोठा अडसर दोघांना सोबत घेण्यात आहे. पालकमंत्री यांच्याबरोबरच माजी महापौर सुनील कदम यांच्याकडून या वादात मुश्रीफ यांनाही ओढले. त्यातून ही आघाडी होण्याची शक्‍यता नाही. या पार्श्‍वभूमीवर या दोघांच्या भेटीला महत्त्व आले आहे. 

"गोकुळ'च्या संचालकांची पंधरवाड्यची बैठकही होती. ही बैठक संपल्यानंतर दोघेही या कार्यालयात आले. बंद खोलीत त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. मुश्रीफ व सतेज पाटील सोबत न आल्यास काय करायचे, किती संचालक विरोधकांना मिळतील यावर या दोघांत चर्चा झाल्याचे समजते. येत्या आठवडाभरात विद्यमान संचालकांशीही हे दोन्ही नेते चर्चा करणार असल्याचे समजते. "गोकुळ'च्या निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या घडामोडींना वेग येणार आहे. 

दोन दिवसांत अधिकाऱ्यांची नियुक्ती 
निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती दोन दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. सहकारातील अधिकारी द्यायचा की उपजिल्हाधिकारी दर्जाचा याविषयी मतभेद आहेत. उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना कायदा-सुव्यवस्थे संदर्भात स्वतंत्र अधिकार आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठीही आजपर्यंतचा इतिहास पाहता महसूल विभागातील अधिकाऱ्यांचीच नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com