

MLA rajendra patil yadravkar agriculture pump electricity dues
esakal
Swabhimani Shetkari Sanghatana protest : शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नावावरील वारणा नदीवर असलेल्या पाच कृषीपंपांवर तब्बल ३१ लाख ६६ हजार ११० रुपयांची थकबाकी आहे. त्यांचे वीज कनेक्शन सुरू ठेवले जात आहे. तर दुसरीकडे थकीत बिलापोटी १० अश्वशक्तीपेक्षा जास्त क्षमतेच्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडले जाते. यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.३०) जयसिंगपूर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.