Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

Mohan Joshi, Keshavrao Bhosale Award, Uday Samant; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोल्हापुरात संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला असून पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये
Veteran actor Mohan Joshi receives the Keshavrao Bhosale Award from Uday Samant in Kolhapur.

Veteran actor Mohan Joshi receives the Keshavrao Bhosale Award from Uday Samant in Kolhapur.

esakal

Updated on: 

कोल्हापूर,: ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची मराठीप्रती आत्मियता पाहता ते महाराष्ट्राचा अभिमान आहेत, सध्या ओटीटीवरील कलाकार एका रात्रीत मोठे होत आहेत. मात्र, रंगभूमी, चित्रपटसृष्टीत कष्टातून घडत योगदान देणाऱ्या जोशी यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उदयोगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

येथील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते जोशी यांना मंत्री सामंत यांच्या हस्ते संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, ५१ हजार रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आमदार सतेज पाटील, ज्योती जोशी उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com