
Mother Ended Life : बळ्ळारी जिल्ह्यातील कुरुगोडू तालुक्यातील बारदानहळ्ळी गावात मातेने तिच्या तीन मुलांसह शेतातील तळ्यात उडी मारून आत्महत्या केली. आई सिद्धम्मा (वय ३०), मुले अभिग्ना (वय ८), अवनी (वय ६) आणि आर्या (वय ४) अशी मृतांची नावे आहेत.
मृत सिद्धव्वा ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हसूरचंपू गावची रहिवासी आहे. सिद्धवा हिचे माहेर बेळगाव जिल्ह्यातील होसूर आहे. कुमार (वय ३२) याच्यासोबत सुमारे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते.