हृदयद्रावक: आईने दोन मुलींसह केली आत्महत्या; नवऱ्याने फोडला हंबरडा

 Mother commits suicide with two daughters crime cases in jambhale ichalkaranji
Mother commits suicide with two daughters crime cases in jambhale ichalkaranji
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : दोन मुलींसह आईने विहिरित उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार  जांभळी(ता.शिरोळ)येथे घडला. सुप्रिया शिवाजी भोसले(वय 24) मृणाली शिवाजी भोसले (वय 4),मृणमयी शिवाजी भोसले(वय 5) (सर्व राहणार जांभळी) अशी आत्महत्या केलेल्याची  नावे पोलीस तपासात उघड झाली आहेत.गावातील पिराचा मळा भागातील विहिरीत पाच वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.अन्य लहान मुलगी व तिच्या आईची शोध मोहीम पोलिसांच्या रेस्क्यू टीमने सुरू केली आहे.आत्महत्येचे कारण अध्याप समजू शकले नाही.दोन मुलींसह आईने केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.


सोमवारी दुपारी शाळेला जाण्याचे कारण सांगून संबधित महिलेने दोन मुलींसह घर सोडले.मात्र सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने महिलेच्या घरातील कुटुंबीय चिंतेत पडले.याबाबत  महिलेच्या पतीने त्वरित शिरोळ पोलिसांत धाव घेतली. त्यांनतर मंगळवारी सकाळी महिलेच्या पतीने पै पाहुणांच्या चौकशी केली.अखेर ग्रामपंचायतिच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक महिला दोन मुलींसह पिराच्या मळ्याकडे जाताना निदर्शनास आली. त्यानंतर शोध घेताना पिराच्या मळ्यातील विहरित लहान मुलींचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.या घटनेने हैराण झालेल्या गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्वरित शिरोळ पोलिसांनी धाव घेऊन अन्य मुलीचा व आईचा शोध घेत आहेत.

नवऱ्याने फोडला हंबरडा
आपल्या बायकोने व मुलींची आत्महत्या केल्याने पती शिवाजी भोसले यांनी घटनास्थळी मोठा हंबरडा  फोडला.भोसले कुटुंबात आशा प्रकारचा अनर्थ घडल्याने नातेवाईकासह ग्रामस्थांचा आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Marathi News Esakal
www.esakal.com