

Wathar Vadgaon Villagers Protest : ‘दहीहंडीच्या कार्यक्रमाला जायला तुमच्याकडे वेळ आहे. मात्र, त्यांना वाठार तर्फे वडगावमध्ये येऊन उपोषणाची दखल घ्यायला वेळ नाही. तुमच्या निवडणुकीत आम्ही रॅली काढून तुम्हाला मतदान केले. पण, तुम्ही गावात फिरकला सुद्धा नाही,’ अशा शब्दांत आज ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माने यांना सुनावले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी खासदार, आमदार यांना धारेवर धरले.