शासनाच्या मदतीचे राजकारण: धैर्यशील माने-प्रकाश आवाडे यांच्यात जुगलबंदी

MP Dhairyashil Mane and MLA Prakash Awade Challenge to discuss with each other
MP Dhairyashil Mane and MLA Prakash Awade Challenge to discuss with each other
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील पाईपलाईनद्वारे गॅस वितरण कामाच्या उद्‌घाटन कार्यक्रमांत काल राजकीय जुगलबंदी रंगली. शासनाच्या मदतीवरून खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांनी एकमेकांना चर्चा करण्याचे आव्हान दिले. त्यामुळे जोरदार रंगत आली.


आमदार आवाडे यांनी शुक्रवारी उद्योगासह अन्य घटकांच्या मदतीच्या विषयांवरून शासनावर टीका केली होती. केंद्राच्या मदतीबाबत त्यांनी कौतुक केले होते. या पार्श्‍वभूमीवर काल आमदार आवाडे व शिवसेनेचे प्रवक्ते खासदार एकत्र आले होते. विशेष म्हणजे या वेळी शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची उपस्थिती होती.


आमदार आवाडे यांनी काल पुन्हा एकदा कोरोनानंतर राज्य शासनाने उद्योगासह सर्वच घटकांना मदत केली नसल्याचा पुनरुच्चार केला. या वेळी त्यांनी सेनेच्या  नेत्यांकडे पाहून या विषयांवर चर्चा करण्याचे थेट आव्हान दिले.

याच दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी आपण चौथा पक्ष काढूया, असे निमंत्रण आवाडे यांना दिले. सध्या छोट्या पक्षांना महत्त्व आले आहे, अशी पुस्तीही जोडली. त्यावर आवाडे यांनी आमचा राष्ट्रीय पातळीवरील ताराराणी पक्ष असून तुम्हीच आमच्या पक्षात येण्याचे आवाहन केले.खासदार माने राज्य शासनातील प्रमुख घटक पक्ष असलेले शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे आमदार आवाडे यांच्या आव्हानाला त्यांनी प्रत्युत्तर दिले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com