
Satej Patil vs Dhananjay Mahadik : ‘राजकारणात कालचक्र असते. २०१९ मध्ये माझा निवडणुकीत घात केला. अमलचा पराभव झाला. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक येथेही पराभव झाला. पण, आम्ही कधी एकटे पडलो नाही. आम्ही लोकांची कामे करत होतो. त्यामुळे लोक आमच्याशी जोडले गेले. पराभव झाला म्हणून घरातला टीव्ही फोडला नाही. गाव सोडून गेलो नाही,’ अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्या विरोधकांना टोला लगावला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.