संभाजीराजेंनी घेतला कोल्हापूर विमानतळाच्या विकास कामांचा आढावा

MP sambhaji raje observe the development of working of kolhapur airport in kolhapur
MP sambhaji raje observe the development of working of kolhapur airport in kolhapur

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर विमानतळास भेट देऊन विमानतळावर सुरू असलेल्या विकासात्मक कामांबाबत आज आढावा बैठक घेतली. 

विमानतळ विस्तारीकरण व नाईट लँडींग सुविधांबाबत संभाजीराजे यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंह, मेंबर ऑफ ऑपरेशन्स आय. एन. मूर्ती व नागरी विमान उड्डाण संचलनालयाचे (डी.जी.सी.ए.) चेअरमन अरूण कुमार यांच्यासोबत दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेतली होती. 

बैठकीत कोल्हापूर विमानतळावर नाईट लँडींगसाठी डी. जी. सी. ए. ची तत्वतः मान्यता आहे. मात्र, राज्य शासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता होणे अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर  कोल्हापूर विमानतळ प्रशासनासोबत बैठक घेतली. 
या वेळी संभाजीराजे यांनी विमानतळ विस्तारीकरणामध्ये भूसंपादन बाबत देखील महाराष्ट्र शासनाकडून अद्याप कागदपत्रांची पूर्तता प्रलंबित आहे.

शिवाय काही परवानग्या रखडलेल्या आहेत. या अडचणींचे त्वरीत निवारण करून प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय व कोल्हापुरातील संबंधित शासकीय विभागांबरोबर सुद्धा बैठक घेणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण पवार व कोल्हापूर विमानतळ प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com