KDCC : 'पक्षाच्या आदेशानंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पदांचा निर्णय होईल' - संजय मंडलिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'पक्षाच्या आदेशानंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पदांचा निर्णय होईल'

'पक्षाच्या आदेशानंतरच अध्यक्ष, उपाध्यक्षांचा पदांचा निर्णय होईल'

कोल्हापूर - सध्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडी संदर्भात नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत. या पदांची निवडी या आज दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली आहे. आम्ही पक्षाच्या आदेशाप्रमाणे तीन वाजता निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. निवडून आलेले उमेदवारांसह शिवसेनेच्या निवेदिता माने, मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हेही पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही एकत्र आहोत असा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा असणार आहे का या प्रश्नावर ते म्हणाले, तीन वाजेपर्यंत वरिष्ठांकडून जो आदेश येईल त्या पद्धतीने निर्णय होणार आहे. आमचे संख्याबळ तेवढे नाही संख्याबळाच्या आधारावर पाहिले तर आम्ही पाच लोक आहोत. परंतु जिल्हा बँकेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होण्यासाठी किमान १२ ते १३ सदस्यांची गरज असते. असे असले तरी सध्याच्या घडीला मात्र पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि निर्णय घेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सत्ताधारी गटाच्या संचालक निवेदिता माने (Nivedita mane) व आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर असलेल्या सध्या आमच्यासोबत आहेत. केवळ सन्मान आणि स्वाभिमानासाठी आम्ही ही निवडणूक लढवली आहे. पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील त्यापद्धतीने निर्णय घेतला जाईल. आदेशानंतर निर्णय घेणे ही शिवसनेची पद्धत आहे, त्या निर्णयाची वाट पाहत आहे.

हेही वाचा: ...तर प्राण्याच्या पिल्लांना 'चंपा' आणि 'चिवा' अशी नाव ठेऊ - महापौर पेडणेकर

Web Title: Mp Sanjay Mandlik Says Meeting Afternoon And Take Decision After Order Of Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top