
कोल्हापूर : ‘शहराच्या हद्दवाढीबाबत ग्रामीण भागाच्या चार नेत्यांशी प्रथम चर्चा करतो, नंतर शहर-ग्रामीणची संयुक्त बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊ,’ असे आश्वासन खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीला आज दिले. त्यानंतर या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्याचे आश्वासन दिले.