

MPSC Exam Postponed
esakal
Maharashtra Municipal Election Results Impact : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. २१ डिसेंबर रोजी होणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल याच दिवशी येणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा आणि परीक्षेसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी होणार असल्याची शक्यता वर्तवून अनेकांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.