
अभिजित कुलकर्णी
नागाव : उद्योगाशी संबंधित शासनाचे सर्व विभाग उद्योग वाढीसाठी सकारात्मक आहेत. पण सद्यस्थितीत उद्योगाचे सर्वाधिक शोषण महावितरणकडून सुरू आहे. वीज वितरण कंपनी हा एकमात्र विभाग उद्योगासाठी त्रासदायक ठरत आहे. महावितरणच्या चुकीच्या धोरणांमुळे सूक्ष्म व लघु उद्योगावर आजारी होण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने महावितरणच्या कारभारात हस्तक्षेप करून उद्योगाचे आरोग्य सुधारण्यासाठी सहकार्य करावे, अशी उद्योजकांची मागणी आहे.