Jaysingpur MSRTC : लालपरीला नवी ताकद! एसटी महामंडळाकडून ५१०० नव्या बसेसची ऐतिहासिक खरेदी, राज्यातील आगारांना मोठा दिलासा
MSRTC New Buses : एसटी महामंडळाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी बीएस-६ दर्जाच्या ५१०० बसेस खरेदीसाठी टेंडर काढून सार्वजनिक वाहतुकीला नवे बळ देण्याचा निर्णय घेतला आहे
जयसिंगपूर : गाव खेड्यातून शहराला जोडणारे प्रमुख साधन म्हणून एसटीची ओळख आहे. चार वर्षांपासून एसटी महामंडळाकडे असलेल्या एसटी बसेस नादुरुस्त होत असल्याने अचानकपणे आगारांना मार्ग बंद करावे लागतात.