गारगोटी: कागल, राधानगरी आणि भुदरगड या तीन तालुक्यांचे मुख्य केंद्र व भुदरगड तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या मुदाळतिट्टा येथील मुख्य चौकात आज झालेल्या वाहतूक कोंडीने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. .यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. याठिकाणी वाहनांच्या शिस्तीअभावी वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. प्रवाशांचे मधोमध रस्त्यातच उभे राहणे वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. याठिकाणी उड्डाणपूल अथवा सिग्नल होणे गरजेचे आहे. .Kolhapur News: कोल्हापुरात सैन्य भरतीला तुफान प्रतिसाद! देशभरातून तरुणांची धाव, विद्यापीठ परिसर गर्दीने फुलला.कोल्हापूर - गारगोटी आणि राधानगरी - निपाणी या दोन मार्गांना जोडणारे मुदाळतिट्टा हे केंद्र आहे. या महत्त्वाच्या ठिकाणी दुपदरी मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. रविवारचा दिवस तर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा असतो. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. .याठिकाणी वाहतूक पोलिस नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. प्रवासी हे रस्त्याच्या मधोमध उभे राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हॉर्न वाजवूनही वाहन जवळ आले तरी प्रवासी आपली जागा सोडत नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रसंगदेखील घडत आहेत. .Kolhapur News: आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार निवडणुकीच्या तोंडावर आमदार सतेज पाटील यांचा आरोग्यमंत्री आबिटकर यांना थेट आणि जोरदार इशारा.शाळेतील विद्यार्थीदेखील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत असल्यामुळे वाहन चालवण्यास अडचण निर्माण होते. या ठिकाणी प्रवासी निवारा शेड नसल्यामुळेदेखील ही अडचण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. बस पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी वर्ग आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे..गर्दीत भरच ...रविवारी सुटीचा दिवस असल्याने व आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्गुरू बाळूमामा मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने मुदाळतिट्टा येथे गर्दीत भरच पडत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.