shingnapur bandhara : आठवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पाण्याचा नदीकाठच्या पिकांत शिरकाव होऊन दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होते. म्हणून शेतकऱ्यांतून बरगे काढण्याची मागणी जोर धरू लागली होती.
Municipal officials removing barges from Shinganapur land as part of anti-encroachment driveSakal
शिंगणापूर : गुरुवारी (ता. २२) सकाळी ९ च्या सुमारास पालिकेतर्फे पाणी अडविण्यासाठी असलेल्या बंधाऱ्याच्या दरवाजांना बसविण्यात आलेल्या लोखंडी अर्धवक्राकार प्लेट्स जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भागातील शेतकरी सुखावला आहे.