कोल्हापूर : पूर्वी रिंगणातील उमेदवारांची संख्या भरपूर असायची. त्यामुळे एक ते दोन हजार मतांची बेजमी झाल्यास अनेकांचा विजयाचा मार्ग सुकर व्हायचा; पण आता चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार प्रथमच निवडणूक होत आहे. .मतदार संख्या त्या प्रमाणात वाढल्याने किमान सात हजारांवर मते घेतल्याशिवाय विजयाची पायरी चढणे मुश्किल दिसत आहे. मतदान किती होते, याबरोबरच क्रॉस व्होटिंगवरही बरेच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे ‘मी सेफ’ म्हणण्याचे दिवस संपले आहेत..Kolhapur Politics : गोलमाल है भाई गोलमाल! कोल्हापूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत सावळा गोंधळ, आयुक्त के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या....एकसदस्यीय प्रभागरचनेत मर्यादित मतदार असायचे. पक्षांच्या उमेदवारांबरोबरच अपक्षांनाही संधी असायची. यामुळे उमेदवारांची संख्या मोठी असायची. अनेक उमेदवार दुसऱ्या ताकदवान उमेदवाराची मते खाण्यासाठी त्याच्या भागात डमी उमेदवारही उभे करायचे. .त्यामुळे मतांची विभागणी व्हायची. तशातही जो ताकदवान उमेदवार जास्तीत जास्त मतदारांना आकृष्ट करेल, त्याच्यावर विजयाचा गुलाल पडायचा. ही निवडणुकीची पद्धत अनेकांना सवयीची झाली होती. पाच वर्षांत त्या पद्धतीने पेरणी करायचे. .Baramati Election : माळेगाव निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’चा भडका; पॅनेल टू पॅनेल मतदानाचा फॉर्म्युला उधळला!.कुणाचे पाय ओढायचे, हे ठरवले जायचे. अशा साऱ्या समीकरणांमुळे एक हजार ते दोन हजार मते मिळवण्याची तजवीज केल्यास तो विजयी व्हायचा. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे मात्र हे दिवस संपले आहेत..बहुसंख्य प्रभागात २२ हजारांपासून २७ हजारांपर्यंत मतदार संख्या आहे. मतदानाची टक्केवारी किती होते? यावर सारे अवलंबून आहे. तरीही उमेदवाराला विजयाला गवसणी घालायची असल्यास किमान सात हजार मतांचा टप्पा गाठावा लागेल, असे दिसते. .त्यातही प्रत्येक प्रभागातील पॅनेलमधील अन्य उमेदवारांना कितपत साथ दिली जाते, यावर बरेच अवलंबून आहे. चार उमेदवारांमधील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. मी माझ्या मतांची तजवीज करतो, असे शक्य नाही. .माझी त्या भागात माणसे आहेत, असे म्हणूनही चालणार नाही. त्या भागात जाऊन आपल्याला मतदान करा, असे सांगण्याबरोबरच सोबतच्या उमेदवारांनाही मतदान करा, असे सांगावे लागेल. तरच इतर उमेदवारांची त्यांच्या भागातील मते मिळतील..संपूर्ण प्रभागात आपल्याबरोबरचे उमेदवार पोहचवावे लागणार आहेत. तरच मतांची पोतडी भरण्यास मदत होणार आहे. क्रॉस व्होटिंगचा प्रकार घातक पॅनेलनुसार मतदान झाले तर त्यातील उमेदवारांना विजयाची संधी मिळणार आहे; पण आपल्यापुरते मतदान टाका असा प्रचार झाला, तर क्रॉस व्होटिंगचे प्रमाण वाढणार आहे..त्या पॅनेलमधील उमेदवारांना हा प्रकार धोकादायक ठरणार आहे. एकमेकांची मदत झाली, तरच आवश्यक मते मिळणार आहेत. अन्यथा अनेकांना झटका बसू शकतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.