

Municipal Election Deadline
sakal
कोल्हापूर: नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्षांसह नगरसेवक पदासाठीचे अर्ज माघार घेण्याची वेळ जशी जवळ येईल, तशा त्या त्या नगरपालिका क्षेत्रात घडामोडींना वेग आला आहे. आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी विरोधी उमेदवारांवर दबाव टाकण्याबरोबरच भविष्यातील राजकारणाचा ‘शब्द’ किंवा थेट आर्थिक आमिष दाखवून माघारीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत.