Kolhapur Municipal : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्हा परिषदेच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती
Senior Officers Appointed : कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी,आदर्श आचारसंहिता, उमेदवारी छाननी ते मतमोजणीपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी नियुक्त अधिकाऱ्यांकडे
कोल्हापूर : कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व सुयोग्य अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.