पालिका कर्मचाऱ्यांना आता परस्पर रजेवर जाता येणार नाही कारण.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Corporation

पालिका कर्मचाऱ्यांना आता परस्पर रजेवर जाता येणार नाही कारण....

इचलकरंजी : पालिका कर्मचा-यांना पूर्व मंजुरी न घेता परस्पर रजेवर आता जाता येणार नाही. पूर्व मंजुरी न घेतल्यास त्या दिवसाची अनुपस्थीती असल्याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे या दिवसाच्या वेतनावर कर्मचा-यास पाणी सोडावे लागणार आहे. याबाबतचा स्पष्ट आदेश मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी दिला आहे. यामुळे पालिका कर्मचा-यांच्या परस्पर रजेवर जाण्याच्या प्रकाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.

इचलकरंजी पालिकेकडील अनेक अधिकारी व कर्मचारी हे कोणतीही पूर्व परवानगी न घेता परस्पर रजा देवून कार्यालयात अनुपस्थीत राहतात. यामुळे पालिकेच्या महत्वाच्या कामांबाबत विलंब होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

हेही वाचा: निपाणीत तालुका आचारसंहिता समितीची निर्मिती

प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही त्याचा अनेकवेळा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. वास्तविक नियमानुसार पूर्व मंजुरी असल्याशिवाय रजेवर जाता येत नाही. मात्र याबाबत बहुतांशी अधिकारी व कर्मचारी मनमानीप्रमाणे रजा टाकतात. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर मुख्याधिकारी ठेंगल यांनी ही बाब गांभिर्यांने घेतली आहे.

पूर्व मंजुरी न घेता परस्पर रजा घेतल्यास त्या दिवसाची अनुपस्थीती अशी नोंद केली जाणार आहे. त्यामुळे या दिवसाचे वेतनही मिळणार नाही. पालिकेच्या सर्वच कर्मचा-यांसाठी हा लेखी आदेश मुख्याधिकारी ठेंगल यांनी दिला आहे. तीन दिवसांपेक्षा जादा कालावधीची विनादखल अनुपस्थीती ही शास्तीस पात्र ठरवली जाणार आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही श्री.ठेंगल यांनी दिला आहे.

loading image
go to top