निपाणीत तालुका आचारसंहिता समितीची निर्मिती | Nipani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निपाणीत तालुका आचारसंहिता समितीची निर्मिती

निपाणीत तालुका आचारसंहिता समितीची निर्मिती

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्याने दोन दिवसापूर्वी आचारसंहिता जाहीर झाली आहे. आता निपाणीत तालुका आचारसंहिता समितीची निर्मिती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष तर अन्य काही अधिकारी समितीचे सदस्य आहेत. या समितीकडून तालुक्यात आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे.

बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्हयात ६ वर्षानंतर विधानपरिषद निवडणूक जाहीर झाली आहे. परिणामी निवडणूक जाहीर झाल्यावर आचारसंहिता जारी झाली आहे. निपाणी तालुका प्रशासनालाही आचारसंहिता अंमलबजावणीचे आदेश आल्यावर राजकीय, सामाजिक जाहिरातीचे फलक, जाहिरात होर्डींग हटविण्यात आले आहेत. शिवाय आचारसंहितेमुळे कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम करता येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमावरही निर्बंध आले आहेत.

हेही वाचा: चिक्कोडी तालुक्यातील पूरग्रस्तांना चिंता; उत्पादन घटण्याची भीती

आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी येथे तालुका आचारसंहिता समितीची निर्मिती झाली आहे. तहसीलदार समितीचे अध्यक्ष आहेत, तर पालिका आयुक्त, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी व पंचायत विकास अधिकारी हे सदस्य आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यावर कारवाई करण्याचा अधिकार या समितीला आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी होणार असल्याने हळूहळूलभागात निवडणुकीचे वातावरण जाणवणार आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका आचरसंहिता समिती निर्माण केली आहे. समितीचे अध्यक्ष आपण आहोत. तालुक्यात कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही, यावर समितीचे लक्ष राहील. विकासकामांच्या उदघाटनासह कोणतेही राजकीय कार्यक्रम करता येणार नाहीत.

- डाॅ. मोहन भस्मे, तहसीलदार, निपाणी

loading image
go to top