
सचिन भोसले
कोल्हापूर : एकेकाळी महापालिकेच्या शाळा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे शिक्षणाचे मुख्य केंद्र; मात्र खासगी आणि इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत काही वर्षांत या शाळांत विद्यार्थी गळतीचा प्रवास सुरू झाला. तरीही आशेचा किरण म्हणजे यंदा या शाळांत ३३४ नव्या विद्यार्थ्यांची भर पडली. एकूण पटसंख्या ११ हजार ७७ झाली आहे; पण वाढत्या पटसंख्येला आवश्यक ती सुविधा, तंत्रज्ञान आणि निधीची जोड हवी आहे. ‘ज्ञानाची गंगा पुन्हा वाहूद्या, दगडांचा अडसर दूर करूया.. महापालिकेच्या शाळांना नवा श्वास देऊया’ असाच सूर पालक, नागरिकांतून व्यक्त होत आहे.