

irrigation department
sakal
कोल्हापूर : जलसंपदा व महापालिकेकडे असलेल्या थकबाकी रकमांचे समायोजन करून निव्वळ देय रकमा निश्चित करण्याचा निर्णय आज झालेल्या महापालिका व जलसंपदा विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यातून ३१ मार्चपर्यंत आणखी काही रक्कम भरण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जाणार आहे. तर पोकळ थकबाकीत सूट मिळवण्यासाठी शासन पातळीवर बैठक घेऊन अंतिम निर्णय केला जाईल, असे महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितले.