Kolhapur Crime : दारू पिऊन घरी परतताना पूर्ववैमनस्यातून मध्यरात्री मित्राचा डोक्यात दगड घालून खून

पूर्ववैमनस्यातून बुधवारी मध्यरात्री मित्राचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.
Rajwada Police Crime News
Rajwada Police Crime Newsesakal
Summary

मृत आणि संशयित दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नासह अन्य गुन्हे दाखल आहेत.

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून बुधवारी मध्यरात्री मित्राचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. संभाजीनगर- निर्माण चौक (मैलखड्डा) येथे हा प्रकार घडला. शुभम अशोक पाटील (वय २८, रा. अयोध्या कॉलनी, रामानंदनगर परिसर) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी संशयित संग्राम रंगराव पाडळकर (२६, रा. पाडळकर कॉलनी) आणि शुभम ऊर्फ बंडा प्रकाश मोरे (२५, रा. सम्राट कॉलनी, नेहरूनगरजवळ सर्व कोल्हापूर) यांना अटक केली. शुभमचे वडील अशोक भीमाशंकर पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) फिर्याद दिली.

Rajwada Police Crime News
Prakash Ambedkar : 'हिटलरने ज्यू लोकांसोबत जे केलं, तेच RSS तुमच्या सोबत करेल'; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गतीने तपास केला. शुभम कोणाबरोबर दारू पिण्यासाठी गेला होता, याची माहिती घेत संशयितांना पाच-सहा तासांत शिये फाट्यावरून ताब्यात घेतले. दोघांनाही जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांनाही चार डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मृत आणि संशयित तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. बुधवारी रात्री दारू पिऊन घरी परतताना पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, निर्माण चौकाजवळ मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. त्याच परिसरातील एकाने मृतदेह कोणाचा आहे, याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी आलेल्या वडिलांनी शुभमचा मृतदेह ओळखला. त्यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पाडळकर आणि मोरेला ताब्यात घेतले. दोघांनी अधिक चौकशीत खून केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे.

Rajwada Police Crime News
Bidri Election : जिल्हाध्यक्षांच्या पराभवासाठी थेट मंत्रीच मैदानात; मुश्रीफ-चंद्रकांतदादांनी आखली रणनीती, कोणाचा होणार पराभव?

अशोक पाटील दीड वर्षापासून रामानंदनगरमध्ये भाडेतत्त्वावर कुटुंबासोबत राहतात. यापूर्वी ते आयसोलेशन हॉस्पिटलजवळील नेहरूनगरमध्ये राहत होते. पत्नी कल्पना आणि मुलगा शुभम मोलमजुरी करून संसार चालवित होते. शुभमचे पाडळकर व मोरे खास मित्र. या दोघांचे वर्तन बरोबर नसल्यामुळे त्यांच्यासोबत फिरू नको, असा सल्ला शुभमला त्याच्या अन्य मित्रांनी दिला होता.

त्यानंतर शुभम त्यांच्यासोबत जाण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे दोघांनी शुभमला शिवीगाळ करून आमच्या सोबत आला नाहीस तर सोडणार नाही, अशी धमकी देत सोबत घेऊन जात होते. त्याच्याकडीलच पैसे खर्च करीत होते. त्यामुळे त्यांनीच खून केल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष गळवे तपास करीत आहेत.

धक्काच बसला

बुधवारी रात्री शुभमचे वडील अशोक आणि त्यांची पत्नी रात्री जेवण करून शुभमची वाट पाहत होते. त्यावेळी तो हॉकी स्टेडियम परिसरात पाडळकर आणि मोरेसोबत होता. तो, रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. अशोक पाटील यांना मध्यरात्री पोलिसांनी उठवून तुमच्या मुलाचा खून झाल्याचे सांगितले. तेव्हा दोघांनाही धक्का बसला.

Rajwada Police Crime News
म्हादईची कायदेशीर लढाई सरकार निश्चितच जिंकेल, पण महाराष्ट्रानेही..; काय म्हणाले मुख्यमंत्री सावंत?

...असा केला खून

मृत आणि संशयित दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नासह अन्य गुन्हे दाखल आहेत. त्यांना दारूचे व्यसन होते. गुरुवारी रात्री संभाजीनगरातील बिअर बारमधून तिघेही घरी जात होते. वाटेत निर्माण चौकातील मैदानावर लघुशंकेसाठी थांबले असता त्यांच्यात वाद झाला. पाडळकर आणि मोरेने त्याचा डोक्यात दगड घालून खून केला. मृत शुभमच्या डोक्याचा चेंदामेदा झाला होता. पोलिसांनी मृतदेहाजवळील दगड आणि अन्य साहित्य जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com