esakal | कागल : अपघाताचा बनाव करून वडिलांचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

कागल : अपघाताचा बनाव करून वडिलांचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कागल : अपघाताचा बनाव करून मुलानेच वडिलांच्या डोक्यात लोखंडी पारने घाव घालून खून केल्याचा गुन्हा कागल (kagal) पोलिसांनी उघडकीस आणला. अपघाताबाबत संशय आल्याने पोलिसांनी तपास उलट्या दिशेने सुरू ठेवला होता. तपासातून हा अपघात नसून घातपाताची शंका आल्याने खुनाच्या गुन्ह्याची उकल झाली. कागल पोलिसांनी संशयित आरोपी अमोल दत्तात्रय पाटील याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. याबाबतची माहिती करवीरचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे उपस्थित होते.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ३० ऑगस्टला कागल-निढोरी मार्गावर केनवडे ओढ्याच्या पुलावर वाहनाच्या धडकेत दत्तात्रय रामचंद्र पाटील यांचा अपघात झाल्याची फिर्याद कागल पोलिसांत दाखल झाली होती. पंचनामा करताना पोलिसांना दत्तात्रय पाटील यांच्या अंगावर इतरत्र कोठेही इजा झाली नव्हती. फक्त डोक्यालाच जबर मार लागला होता. यावरून घातपात झाल्याचा संशय आला.

हेही वाचा: चीन आमचा सर्वात महत्त्वाचा सहकारी - तालिबान

सहाय्यक पोलिस निरीक्षक वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. दत्तात्रय पाटील कामानिमित्त इचलकरंजीत राहत असे. दोन महिन्यांतून एकदा ते घरी येत असे. पत्नी व मुलगा अमोल यांना दारू पिऊन वारंवार घरात भांडणे काढत असे. याच रागातून अमोलने वडिलांच्या डोकीत लोखंडी पारने घाव घालून त्यांचा खून केली व अपघात झाल्याचा बनाव केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे.

पोलिस उपअधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वाकचौरे यांनी सहकारी विजय पाटील, महादेव बिरंजे, विनायक औताडे, आनंदा कोंडरे, संदेश पोवार, सिल्वा कोडनाईक यांच्या साथीने खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला. याबद्दल श्री. पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले.

loading image
go to top