
इचलकरंजी : दारू पिण्यासाठी तीस रुपये न दिल्याच्या कारणातून खून
इचलकरंजी : दारू (Alcohol)पिण्यासाठी तीस रुपये न दिल्याच्या कारणातून एकाचा खून (Murder)केल्याची घटना येथील डेक्कन चौक परिसरात गुरूवारी रात्री घडली. मयत हा भिकारी असून मामू म्हणून तो परिसरात परिचीत होता. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी सचिन लिंगाप्पा पाटील ( वय २७, रा. कोरवी गल्ली, जवाहर नगर) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा: पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात अभ्यास दौरा
यातील यातील मृत हा फिरस्ता असून डेक्कन चौक परिसरात भिक मागून तो उदरनिर्वाह करीत होता. त्याच्याकडे संशयित सचिन यांने दारुसाठी तीस रुपये मागितले. पण त्यांने दिले नाहीत. तर आपला मित्र दंडोजीला त्याने वीस रुपये दिले. या रागातून संशयीत सचिनने मृताच्या डोक्यात सिमेंटचा दगड घालून खून केला. याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल अरविंद माने यांनी दिली आहे. घटनास्थळावरून सिमेंटचा दगड जप्त केला आहे.(Kolhapur news)
Web Title: Murder For Not Paying Thirty Rupees For Drinking
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..