
पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने काश्मीरमधील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात अभ्यास दौरा
पुणे : जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir)सरकारच्या पशुसंवर्धन खात्यांतर्गत दुग्ध व डेअरी व्यवसायाशी निगडित शेतकऱ्यांसाठी क्षमता विकास कार्यक्रमांतर्गत व आम्ही पुणेकर संस्थेच्या पुढाकाराने जम्मू-काश्मीरमधील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी(Farmer) महाराष्ट्रात अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दहा शेतकऱ्यांनी कोल्हापूर, बारामती, पुणे, नाशिक आदी भागात दौरा केला. महाराष्ट्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीविषयक आधुनिक गोष्टी या शेतकऱ्यांना पाहता याव्यात तसेच या तंत्रज्ञानाचा अवलंब जम्मू काश्मीरमध्ये व्हावा हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत (Press conference)दिली.
हेही वाचा: पुणे : न्यायालयाचे कामकाज एक तासाने केली कमी
या प्रसंगी पुण्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, जम्मू काश्मीर पशुसंवर्धन विभागाचे तांत्रिक अधिकारी डॉ. शाबाद हुसेन, जनसंपर्क अधिकारी डॉ. संदीप कुमार आदी उपस्थित होते. जम्मू काश्मीर पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. सागर डोईफोडे यांच्या प्रयत्नातून व बोटे यांच्या सहकार्याने हा दौरा राबविण्यात आला होता. या दौऱ्यात शेतकऱ्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालय, वाकड येथील गोशाळा, सोनाई दूध व डेअरी प्रकल्प, बारामती व भवानीनगर साखर कारखाना, गोकूळ डेअरी प्रकल्प (कोल्हापूर) आदी विविध प्रकल्पांना भेट दिली.(Pune news)
हेही वाचा: पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये एकदाच पैसे भरा, दर महिन्याला मिळवा व्याज
यावेळी बोटे म्हणाले, ‘‘ जम्मू काश्मीर राज्यातील डेअरी विषयातील अभ्यासू शेतकरी चमू महाराष्ट्रात या विषयातील नविन तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भेट देत असल्याने दोन्ही राज्यांमधील तंत्रज्ञान आणि विचारांची देवाण-घेवाण घडली. वारंवार अशा प्रकारच्या दौऱ्यांचे आयोजन फायद्याचे ठरेल.’’
हा दौरा अभ्यासपूर्ण झाला असून भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल असे यावेळी जाधव यांनी सांगितले. तर दौऱ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव यावेळी व्यक्त केले.
Web Title: Study Tour In Maharashtra For Farmers In Kashmir Initiated By Punekar Sanstha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..