

Nanda Pol, the first woman president of Zilla Parishad, during her tenure.
sakal
नांदणी (ता. शिरोळ) : गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्यात नंदा पोळ यांनी अर्ज दाखल केला. ही माहिती कुणीतरी ज्येष्ठ काँग्रेस नेते रत्नाप्पा कुंभार यांना सांगितली. कै. कुंभार यांनी पोळ कुटुंबीयांना बोलावून घेऊन या निवडणुकीतून माघार घ्या, तुम्हाला भविष्यात मोठी संधी देण्याचे आश्वासन दिले.