'सुपारी घेऊन आंदोलन करता का? मराठा आरक्षणाचं आंदोलन राजकारणाच्या दिशेला नेऊ नका'; नरेंद्र पाटलांचा कोणाला इशारा?

Narendra Patil : मराठा समाजाचा वापर केवळ निवडणुकांपुरता करण्यात आला. त्यांना देताना मात्र हात आखडता घेण्याची भूमिका नेत्यांनी घेतली.
Narendra Patil
Narendra Patil esakal
Updated on
Summary

''राजकारणात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असला तरी नोकरीत त्याचे स्थान कमी आहे. त्यामुळेच महामंडळाची पुनर्रचना करून मराठा समाजाचे हित साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.''

कोल्हापूर : ‘सत्ताधाऱ्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन आंदोलन करता का? मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन राजकारणाच्या दिशेला नेऊ नका. मराठा समाजाला लाभ मिळवून देणाऱ्यांबद्दल निंदा कशाला करता?’, असा सवा‍ल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी येथे उपस्थित केला. दरम्यान, ‘महायुतीचाच मुख्यमंत्री होईल’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com