कोल्हापुरच्या कन्येची राष्ट्रीय पारितोषिकावर मोहोर ; नाविन्यपूर्ण सेंद्रिय खताचे केले संशोधन

national award winning by supriya kusale in kolhapur research in organic fertilizers in kolhapur
national award winning by supriya kusale in kolhapur research in organic fertilizers in kolhapur
Updated on

कोल्हापूर : असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजतर्फे (नवी दिल्ली) आयोजित राष्ट्रीय संशोधन 'अन्वेषण' स्पर्धेत राजाराम महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाची पीएच. डी. विद्यार्थिनी सुप्रिया प्रकाश कुसाळे (वळीवडे) हिने संशोधीत केलेल्या सेंद्रिय खतास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 

भारतातून आलेल्या विविध व नाविन्यपूर्ण प्रवेशिकांमधून तिच्या 'इकोफ्रेंडली अँड कॉस्ट एफ्फेक्टिव्ह प्रॉडक्शन ऑफ फायटेज प्रोड्युसिंग बायोईनॉक्लन्ट अँड इस्ट इफिकसी इन फील्ड' संशोधनास वाखाणण्यात आले. तिने पर्यावरणपूर्वक, किफायती फायटेज तयार करण्याची क्षमता असलेले जैविक खत तयार केले आहे. तीन वर्षे सुरु असलेल्या  संशोधनात या खतामुळे ऊस, मका, मिरची, आले, हळद, ज्वारी, व भात या पिकांची गुणवत्ता वाढण्यासोबतच मातीची सुपीकता देखील वाढल्याचे दिसून आले.

जानेवारीत मुंबईत झालेल्या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा 'आविष्कार'मध्ये तिच्या संशोधनास प्रथम क्रमांक मिळाला. फेब्रुवारीत मुंबई येथेच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही या संशोधनास प्रथम क्रमांक मिळाला. भोपाळ येथे मार्च महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्राधिनिधित्व करणार होती.  कोविड १९ च्या परिस्थितीमुळे स्पर्धा डिसेंबरमध्ये ऑनलाईन झाली. 

तिला राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनर, सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख व मार्गदर्शक डॉ. यास्मिन आतार, प्रा. शोभना भोसले व प्रा. शहनाज फारुकी यांचे मार्गदर्शन, तर शोभा कुसाळे, प्रकाश कुसाळे, प्रतीक कुसाळे व डॉ. गणपती सूर्यवंशी यांचे सहकार्य मिळाले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com