Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

Kolhapur road accident news : रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी परतताना नॅशनल हायवेवर झालेल्या अपघातात विवाहितेचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे दोन मुलांवर मातृछत्र हरपले आहे.
National Highway accident kagal

National Highway accident kagal

esakal

Updated on

Railway exam candidate accident : रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी परताना आज दुपारी झालेल्या अपघातात विवाहितेचा मृत्यू झाला. पल्लवी राहुल पाटील (वय ३०, रा. मौजे सांगाव, ता. कागल) असे त्यांचे नाव आहे. महामार्गावर येथील लक्ष्मी टेकडी येथे अनोळखी वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून ठोकरले. अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले त्यांचे वडील किरकोळ जखमी झाले. दुपारी सव्वातीन वाजता अपघात झाला. त्यानंतर घटनास्थळी वाहतुकीची कोंडी झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com