Hasan Mushrif
Hasan Mushrifesakal

Hasan Mushrif : 'कार्यकर्त्यांनो, कामाला लागा! मुश्रीफांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करु'; जिल्हाध्यक्षांचं आवाहन

विधानसभेच्या पाच मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करायचे आहे.
Summary

बाजार समिती येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली.

कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील ज्या तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार नाहीत अशा तालुक्यांत जिल्हा नियोजनमधून मोठ्या प्रमाणात निधी दिला जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे’, अशा सूचना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिल्या.

Hasan Mushrif
मोठी बातमी! गृहमंत्र्यांच्या जवळच्या नेत्याचा सुपारी देऊन खून; लोकसभा निवडणूक लढवण्याच्या होते तयारीत

बाजार समिती येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी ताकदीने काम करत आहे. याचाच एक भाग म्हणून विधानसभेच्या पाच मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करायचे आहे. त्यासाठी आतापासून नियोजन केले पाहिजे.

Hasan Mushrif
Karnataka Politics : 'या' दोन बड्या नेत्यांमधला वाद टोकाला; हायकमांड करणार हस्तक्षेप, काँग्रेस सरकार धोक्यात?

प्रभागनिहाय किंवा विधानसभा मतदारसंघनिहाय कमिट्या स्थापन केल्या जाणार आहेत. या कमिट्यांच्या माध्यमातून गावागावात कार्यरत राहिले पाहिजे.’ यावेळी आमदार राजेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, भैय्या माने, संतोष पाटील, ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगुले, रामाप्पा करिगार, पंडितराव केणे, यासिन मुजावर, अमित गाताडे, राजाराम धारवट, निहाल कलावंत, विकास पाटील, आप्पासाहेब धनवडे, जयसिंगराव देसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com