esakal | कोल्हापूर ; स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे सचिन पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Sachin Patil as kolhapur municipal corporation Standing Committee Chairman

 महापालिका सभागृहाची मुदत येत्या २० नोव्हेंबला संपणार आहे. नंतर पुढील तीन महिने प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर ; स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे सचिन पाटील 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महापालिका स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कोरोना संकटकाळात ही निवड लादली गेली आहे. राजकीय स्वार्थासाठी निंद्य खेळ सुरू असल्याचा आरोप करत विरोधी भाजप ताराराणी आघाडीने निवडीवर बहिष्कार टाकला. आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सचिन पाटील यांची बिनविरोध निवड निश्‍चित आहे. शुकवारी (ता. 28) निवडीची औपाचारिक घोषणा होईल.

 महापालिका सभागृहाची मुदत येत्या २० नोव्हेंबला संपणार आहे. नंतर पुढील तीन महिने प्रशासकाची नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. मुदतीपूर्वी ज्यांना पदाधिकारी करण्याचा शब्द दिला गेले ते नाराज होऊ नयेत म्हणून अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी पाटील यांची निुक्ती होत आहे. संदीप कवाळे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. वर्षभरासाठी पद राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे सचिन पाटील यांना संधी दिली जात आहे. पाटील हे फुटबॉल खेळाडू म्हणून परिचित आहेत. दिलबहार तालीम मंडळाच्या माध्यमातून त्यांनी फुटबॉलपटू म्हणून ओळख निर्माण केली. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील यांच्या नावावर काल शिक्कामोर्तब केले. त्यानुसार आज सायंकाळी प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी अर्ज दाखल केला. पाटील यांच्या नावे दोन अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या अर्जाला शारंगधर देशमुख हे सूचक, संदीप कवाळे हे अनुमोदक तर दूसऱ्या अर्जाला देशमुख हे सूचक, शिवसेनेचे नियोज खान अनुमोदक आहेत.

हे पण वाचा - तुम्हीच अंत्यसंस्कार करा असे ऐकावे लागते ; परिचारिका सारिका आनंदे यांचा अनुभव 

विरोधी आघाडीकडून नेमके कोणाचा अर्ज दाखल होतो याकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र आघाडीने आलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्याने पाटील यांच्या निवडीची औपाचारिकता बाकी आहे. शुकवारी (ता. 26) सकाळी साडेअकराच्या सुमारास पाटील यांच्या निवडीची घोषणा होईल. पूर्वी भाजप ताराराणी आघाडीचे संख्याबळ कमी असताना आशिष ढवळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेघा पाटील यांचा पराभव केला होता. बिनआवाजाच्या बॉम्बमुळे सत्तारूढ आघाडीला धक्का बसला होता. नंतर विश्‍वासू सहकाऱ्यांनाच "स्थायी' त संधी दिली गेली. 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top