Kolhapur Politics
sakal
कोल्हापूर
Kolhapur Politics : कागल–मुरगूडसह आठ नगरपालिकांत ‘तुतारी’ गायब; सोयीच्या आघाड्यांमुळे शरद पवार गटाची वाढली अडचण, उमेदवार शोधताना पक्षाच्या तंबूत खळबळ!
Tutari Symbol Disappears : लोकसभा आणि विधानसभावेळी झालेल्या आघाडीतील मित्रपक्षांनी सोयीची भूमिका घेतल्याने शिरोळ, कुरूंदवाड या नगरपालिका, तर हातकणंगले, आजरा, चंदगड या नगरपंचायतींमध्ये पक्षाचे उमेदवार तुतारी वाजविणार आहेत. उर्वरित आठ ठिकाणी उमेदवारच नसल्याने पक्षाचे चिन्ह गायब झाले आहे.
कोल्हापूर : विधानसभेत तीन जागांवर ताकदीने लढूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्ह्यातील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विजयाची ‘तुतारी’ फुंकता आली नाही. त्यातून सावरत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली.

