esakal | कर्नाटकला उत्तर देण्यासाठी यापुढे "नवदुर्गा"; चाकणकर
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Women State President Rupali Chakankar warning leaders of Maharashtra not be tolerated

अन्याय दूर करून घेण्यासाठी नवदुर्गा निर्माण होतील, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन 

कर्नाटकला उत्तर देण्यासाठी यापुढे "नवदुर्गा"; चाकणकर

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : आपण नवदुर्गेची अनेक रुपे पाहिली असुन कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवरील अन्याय असाच कायम ठेवल्यास अन्याय दुर करण्यासाठी आणि सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी यापुढे नवदुर्गा अवतार घेतील तसेच महाराष्ट्रातील नेते मंडळीचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. 


कर्नाटकी प्रशासनाची दडपशाही झुगारुन सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनाचा कार्यक्रम यशस्वी करुन दाखविला यावेळी मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रुपाली चाकणकर करीत बेळगावात दाखल झाल्या होत्या. यावेळी चाकणकर म्हणाल्या  आतापर्यंत कर्नाटकाच्या दडपशाहीबाबत ऐकले होते. मात्र येथे आल्यावर दडपशाहीचा अनुभव आला असुन काळे कपडे घालु नका असा फतवा काढण्यात आला होता.  सीमाभागातील कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील नेते मंत्र्यानीही काळ्या फिती बांधुन कामकाज केले असुन कर्नाटकी दडपशाहीचा निषेध जाहीर  करीत कर्नाटकी सरकारचे धोरण चुकीचे असुन मराठी भाषिकांच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे.

हेही वाचा- निपाणीत काळा दिनी कडकडीत बंद ; बाजारपेठेत शुकशुकाट -

मात्र येणाऱ्या काळात सीमालढा हाती घेण्यासाठी आणि कर्नाटक सरकारला उत्तर देण्यासाठी सीमाभागातील नवदुर्गा निर्माण होतील आणि जागा दाखवुन देतील. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्‍नाची सोडवणुक व्हावी यासाठी जबाबदारीने काम करीत असुन सरकार तुमच्या सोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण होणार असुन सीमाभागातील जनतेला विविध प्रकारच्या सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. असे मत त्यांनी व्यक्‍त केले. 
धरणे आंदोलनावेळी मराठी भाषिकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीसांनी सर्वत्र बॅरीकेटस लावुन अडवणुक करण्याचा प्रयत्न केला तरीही गनिमी कावा करीत कार्यकर्ते मराठा मंदिर येथे पोहचले त्यामुळे पोलीसांचा दडपशाही झुगारुन कार्यक्रम झाला.

संपादन - अर्चना बनगे
 

loading image
go to top