कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी कोल्हापुरात सापडला अन् कर्नाटकातील धोका टळला...

The new corona patient is not from Kolhapur
The new corona patient is not from Kolhapur
Updated on

कोल्हापूर - मुंबई, सांताक्रूझ, हनुमान टेकडी येथील झोपडपट्टीतील कंटेनरमधून चोरटीवाहतूक करुन जाणाऱ्या कर्नाटकमधील 30 लोकांना किणी टोल नाक्‍यावर ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली होती. यापैकी 11 लोकांचे अहवाल आज आले. यामध्ये एका प्रवाशाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सिध्द झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह झालेला रुग्ण कोल्हापूरातील नसून त्याच्यावर कोल्हापूरात उपचार केले जात आहे. उर्वरित 19 अहवाल अजून प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. गुरुवारी (ता. 16) हा कंटेनरच्या चालक आणि वाहकासह एकूण 30 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि पोलीसांच्या सर्तकतेमुळे कर्नाटकमधील ज्या शहरात हे लोक जाणार होते त्या शहरातील मोठा धोका टळला आहे.

जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, मुंबई येथून हा कंटेनर कर्नाटकला जात होता. किणी टोलनाक्‍यावर या कंटेनर, चालक, वाहकासह एकूण 30 जणांना गुरुवारी (ता. 16) ताब्यात घेतले. त्यांची शुक्रवारी (17 ) सीपीआरमध्ये तपासणी करण्यात आली. आज 11 लोकांचे अहवाल आहे. यामध्ये एक प्रवाशाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित 19 रिपोर्ट प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वांचे कोरोना तपासणी चाचणी केली आहे. यामध्ये आज एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, कोल्हापूरातील जिल्हा प्रशासन आणि पोलीसांमुळे हा कंटेनर ज्या ठिकाणी जाणार होता, त्या गावातील मोठा धोका टळला असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.....

तो चालक नाही, प्रवासी आहे...

पोलीसांनी सांताक्रूझहून कर्नाटककडे जाणारा कंटेनर किणी टोलनाक्‍यावर तपासला. यामध्ये चालक, वाहकासह 30 जणांचा समावेश होता. महिला आणि लहान मुले ही आहेत. त्यांना सीपीआरमध्ये तपासणीसाठी आणले असता त्यांचे कोरोना तपासणी नमुने घेतले. यातील एका 57 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या प्रवाशांचा प्रवास येथेच थांबवल्याने पुढील संसर्गाचा मोठा धोका टळला आहे.
डॉ. अभिनव देशमुख - जिल्हा पोलीस अधिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajendra Yadravkar Sainik Takali MIDC black flag shirol
Kolhapur 10 Km Flyover Project Details
Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur
Madhuri Elephant Nandani Math Return
Marathi News Esakal
www.esakal.com