
Sugar Industry Installment Policy : राज्य सरकारच्या थकहमीवर राज्यातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमकडून (एनसीडीसी) दिल्या जाणाऱ्या कर्जाचा एक हप्ता जरी थकला तर त्या कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करण्याचे नवे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. अशा प्रकारे दिलेल्या राज्यभरातील साखर कारखान्यांकडील वाढती थकबाकी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.