या अभ्यासात १०० ग्रॅम तांदळामध्ये सरासरी ३०.८ ते ८.६१ कण सूक्ष्म प्लास्टिक आढळले. हे कण मुख्यतः पारदर्शक फायबर स्वरूपाचे असून, १००-२०० मायक्रोमीटर इतक्या आकाराचे होते.
कोल्हापूर : बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या (Rice) विविध ब्रॅण्ड्समध्ये सूक्ष्म प्लास्टिक कणांचे प्रमाण आढळते, ज्यामुळे कर्करोग (Cancer), श्वसन आणि पचनाशी संबंधित विकार उद्भवण्याचा धोका आहे. विशेषतः महिलांचे सूक्ष्म प्लास्टिक सेवन पुरुष, मुलांपेक्षा जास्त आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. अनिल गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून ते स्पष्ट झाले आहे.